मुंबई विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थी आंदोलनाला दिशा विद्यार्थी संघटनेचा जाहीर पाठिंबा! दि.१३/०१/२०२० रोजी मुंबई विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन विद्यापीठ प्रशासनाविरोधात सुरू झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने मागण्या आहेत की, विभागांमध्ये नीट शिकवले जात नाही, थेरी आणि एक्टिंग हे दोन्ही विषय अशा शिक्षकाकडून शिकवले जातात ज्यांचा त्या विषयाशी काहीएक संबंध नाही. कोणत्याही पद्धतीच्या सुविधा उपलब्ध नाहीत. वर्ग वेळेवर होत नाहीत. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी घेण्यात आलेले आहेत. जे विद्यार्थी आहेत त्यांना वस्तीगृहाच्या सोई सुद्धा केलेल्या नाहीत. बऱ्याच विद्यार्थ्यांना यामुळे बाहेर राहावं लागतं. त्यांचा खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. अशामध्ये शिक्षण आमचा अधिकार आहे. आणि हा अधिकार आमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ नये आणि आम्ही आमचा अधिकार जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन विद्यार्थी विद्यापीठ परिसरामध्ये आंदोलन करत आहेत. दिशा विद्यार्थी संघटनेकडून या आंदोलनाला सक्रियपणे भागीदारी सह समर्थन देण्यात आलेली आहे. व या संघर्षामध्ये नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून दिशा विद्यार्थी संघटना संघर्ष मध्ये सहभागी आहे.

Facebook Twitter Instagram Linkedin Youtube