ओल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्याचे सरसकट शुल्क माफ करण्यात यावे, यासाठी मुंबई विद्यापीठातील बेमुदत उपोषणाला दिशा विद्यार्थी संघटनेचा जाहीर पाठिंबा. अलीकडेच काही दिवसा अगोदर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्याला ओल्या दुष्काळाचा फटका बसला आहे. शेतीचे आणि इतर मालमत्तेचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुरामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले. हात मजुरी करणाऱ्या कष्टकऱ्यांची परिस्थिती तर अजून देखील अतिशय हालाखीची आहे. त्यात सरकार कडून म्हणावी तशी मदत मिळाली नाही आणि आत्ता पर्यंत देखील सरकार या बद्दल अतिशय उदासीन असल्याचे दिसून येत आहे. अशात याच जिल्ह्यातील सामान्य कष्ट करणाऱ्यांची मुल मुंबई विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना अनेक समस्यांना सामना करावा लागत आहे. अशात विद्यापीठाकडून या भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क व वस्तीगृह शुक्ल असे इतर शुल्क माफ करून त्यांच्या शिक्षणातील अडथळा दूर करण्यास कमी प्रमाणात का होईना मदत करावी. या मागणीला घेऊन विद्यापीठ दरबारी छात्र भारती या विद्यार्थी संघटनेने एक निवेदन सादर केले होते. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कुलगुरू यांनी शुल्क माफीची मागणी मान्य करायला पाहिजे होती. परंतु विद्यापीठ कुलगुरू याबाबत अजून देखील कोणत्याही प्रकारची हालचाल करताना दिसत नाहीत. मुंबई विद्यापीठाची प्रतिमा अगोदरच स्वतःच्या गहाळ कारभारामुळे महाराष्ट्रासह देशभरात धुळीस मिळाली आहे. अशात अजून देखील कुलगुरू मुंबई विद्यापीठ यांनी कोणत्याही प्रकारची नोटीस काढून विद्यार्थ्यांना दिलासा दिलेल्या नाही. त्यामुळे छात्र भारती विद्यार्थी संघटनेने उपोषणास सुरुवात केलेली आहे. आम्ही दिशा विद्यार्थी संघटने कडून विद्यार्थ्यांच्या या मागण्या ला व बेमुदत उपोषणाला जाहीर समर्थन करत आहोत
Related Posts
Condemn the screening of ‘Demography is Destiny’ at TISS!
Oppose the presence of RSS leaders as chief guests on campus! Down with the fascization of education! Disha Students’ Organization…
St. Xavier’s College Cancels its Annual ‘Stan Swamy Memorial Lecture’!
Resist the onslaught by ABVP on democratic rights! Academic institutions should stand up and resist fascist attacks! St. Xavier’s College…
कोथरूड पोलिसांनी केलेल्या तरुणींच्या लैंगिक आणि जातीय छळाच्या प्रकरणाचा निषेध
कोथरूड पोलिसांनी केलेल्या तरुणींच्या लैंगिक आणि जातीय छळाच्या प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी पुण्यातील विविध पक्ष आणि संघटनांनी काल दि. 7…
