वाढत्या महिला आत्याचारा च्या घटना च्या विरोधात दिशा विद्यार्थी संघटना, नौजवान भारत सभा यांनी केले प्रतीकात्मक पितृसत्ताक व्यवस्थेचे दहन. अहमदनगर : दिनांक ८/१२/२०१९ अहमदनगर सहित संपूर्ण देशभरात वाढ झालेल्या महिला विरोधी अपराधाच्या निषेधार्थ प्रतीकात्मक मनुवादी,भांडवली पितृसत्ताक व्यवस्थेचा पुतळा सिद्धार्थनगर भागातील अण्णाभाऊ साठे चौकात सायंकाळी पाच वाजता दहन करण्यात आला.या कार्यक्रमाला विभागातील महिलां सहित नौजवान भारत सभेच्या अनेक कार्यकर्त्यांनी व शहरातील नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी नौजवान भारत सभेचे संदीप सकट यांनी हैदराबाद येथील पशुवैद्यक युवती वर झालेल्या बलात्कार व हत्येचा तीव्र शब्दात निषेध केला व सोबतच ज्या चार आरोपींना पोलिसांनी चकमकीत वस्तुतः खोट्या चकमकीत गोळ्या घातल्या व ठार केले या घटनेबाबत ते म्हणाले, की पोलिसांनी दबंगपणे चकमकी घडवून ठार करण्याने प्रश्न सुटणार नाहीत, आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे हे तेच पोलीस आहेत, ज्यांनी सुरुवातीला हैदराबादच्या त्या युवती बाबत ती पळून गेली असेल असे म्हटले होते व तिला शोधण्यात दिरंगाई केली होती.तसेच उत्तर प्रदेश, उन्नाव येथील युवतीवर बलात्कार करणार्या चारही आरोपींना जामीनावर मोकळे सोडण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा त्या नराधमांनी त्या बलात्कार पिडीत युवतीला जाळले ज्यात तिचा मृत्यू झाला. बलात्काऱ्यांना कठोरातील कठोर शासन झालेच पाहिजे यात काहीही दुमत नाही.या निमित्ताने संपूर्ण देशभरात महिला विरोधी अपराध व त्यांच्या कारणांवर जो खल चालला होता तो पोलिसांच्या एका चकमकीने थंड करून टाकला. म्हणून पुढे अशा घटना घडणारच नाहीत याची शाश्वती देता येणार नाही.वस्तुतः स्त्रीविरोधी अपराधांना पितृसत्ताक व्यवस्था व तिच्यातून स्त्रीला आलेले दुय्यमत्व, भांडवली बाजारू व्यवस्थेने स्त्री देहाचं केलेलं वस्तूकरण,लैंगिकतेचा बाजार या सर्व गोष्टी बलात्कारी घडण्याला कारणीभूत आहेत, कुठल्याही अमुलाग्र सामाजिक परिवर्तन शिवाय अशा पद्धतीने ऑन दी स्पॉट न्याय दिल्यानं बलात्कार होणार नाही ही एक भ्रामक समजूत आहे. राजस्थान मधल्या भवरीदेवी पासून ते आताच्या प्रियांका पर्यंत व्हाया प्रियंका भोतमांगे, निर्भया व ॲसिड हल्ल्यात विरूपित झालेल्या स्त्रिया याच पितृसत्ताक जातीयवादी धर्मांध जुनाट कुजक्या व्यवस्थेच्या बळी आहेत,मग तो आसाराम,राम रहीम,कुलदीप सेंगर,आरिफ हे या पितृसत्ताक व्यवस्थेचे पाठीराखे आहेत. ही व्यवस्था संपवण्यासाठी महिलांनी संघटित झाले पाहिजे याविरोधात संघर्ष केला पाहिजे.
