बंद करा शिक्षणाचा व्यापार! सर्वांना एकसमान आणि आणि निःशुल्क शिक्षण द्यावेच लागेल! दि.२०/११/२०१९ रोजी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश द्वारासमोर JNU विद्यार्थी संघर्षाच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली. दरम्यान जॉइंट एक्शन कमिटी फोर सोशल जस्टिस, दिशा विद्यार्थी संघटना आणि इतर सहयोगी संघटनांनी भागीदारी केली होती. दिशा विद्यार्थी संघटनेकडून अविनाश ने आपले म्हणणे मांडत सांगितले की JNU चे पूर्ण आंदोलन आणि त्यांच्या मागण्या आज खऱ्या अर्थाने समजून घेण्याची गरज आहे. तेव्हा आपल्याला सहज कळेल की, गेल्या सोमवारी विद्यार्थ्यावर दिल्ली पोलिसांकडून जो क्रूर लाठीचार्ज करण्यात आला तो किती अमानवी होता. हे आंदोलन फक्त एका विद्यापीठ पुरते मर्यादित नसून देशभरामध्ये शिक्षणाचे बाजारीकरण करण्यात येत आहे. या विरोधामध्ये आहे. देशभरातील विद्यार्थी आज वाढती फी व शिक्षणाचे बाजारीकरण इतर सोयीसुविधा या ग्राह्य मागण्या ला घेऊन आंदोलन करत आहेत. यात उत्तराखंड येथील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, आयआयटी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आणि बनारस विद्यापीठ अशा अनेक जागेवर संघर्ष सुरू आहे. त्याच कडिमध्ये JNU मधील फि वाढ व नवीन हॉस्टेल नियमावली त्याचाच भाग आहे. अशामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकाच्या संघर्ष सोबत उभे राहत या विद्यार्थी संघर्षाला देशातील कामगार कष्टकरी जनतेपर्यंत घेऊन गेली पाहिजे. तेव्हाच जनता देखील शिक्षणाचे महत्त्व समजून या संघर्षाच्या पाठीशी नक्कीच उभीच राहील. येणाऱ्या काळात देखील बीजेपी, आरएसएस यासारख्या सांप्रदायिक फासिस्ट शक्तींना रोखण्यासाठी विद्यार्थी संघर्ष महत्त्वाची भूमिका नक्कीच बजावेल. हेसुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतले पाहिजे. विरोध निदर्शने संपल्यानंतर दिशा विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांना बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस स्टेशन यांनी विद्यापीठ परिसरांमधून अटक केली. व करियर उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या देण्यात आल्या. दरम्यानच अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी पोलीस स्टेशन वर फोन करून कार्यकर्त्यांना सोडण्यासाठी भडिमार सुरू केला. त्यावेळेस पोलिसांनी कार्यकर्त्यांना सोडून दिले यावरून हे नक्कीच समजले जाऊ शकते की, येणाऱ्या काळात सुद्धा विद्यार्थी आणि जनता एकमेकांच्या संघर्ष सोबत खंबीरपणे उभी राहण्याची अत्यंत गरज आहे. इंकलाब जिंदाबाद!

